विकास खोब्रागडे
जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपुर
चंद्रपुर/- दिनांक २९/१/२०२१ रोजी फिर्यादी नामक विलास दामाजी नैताम रा तिरखुरा ता चिमूर याची मोटार सायकल चोरी गेल्याची तक्रार दिल्याने अ क्र ४९/२०२१ कलम ३७९ , ३४ भादवी चा गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर गुन्ह्याच्या तपासात आरोपि शोध करीत असतात माहिती मिळाली की दोन्ही बस स्टॉप समोर उभ्या असलेल्या मोटरसायकलीवर छेडछाड करीत आहे. अशा खबरे वरून असे १)आशिष रमेश खडसंगी 28 वर्ष २) सचिन बाळकृष्ण शंभरकर वय ३१ वर्ष दोन्ही राहणार भिवापूर जिल्हा नागपूर यांना विचारणा केली असता अंदाजे एक महिना अगोदर येथून लाल रंगाचे मोटरसायकल चोरी गेल्याचे सांगितले.दोन्ही आरोपीचा पीसीआर घेतला असता आरोपी नागपूर येथून पाच मोटरसायकल चोरी केल्याचे कबूल केले.सदर गुन्ह्यात पाच मोटर सायकलची किंमत १’७०२५०/- रुपये सामान दोन्ही आरोपी करून हस्तगत करण्यात आला पोलीस अधीक्षक अरविंद साळवे ,अपर पोलिस अधिकारी प्रशांत खैरे उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन बगाटे, यांच्या मार्गदर्शनात सदरची कारवाई पोलिस निरीक्षक रविंद्र शिंदे पोलीस हवालदार विलास निमगडे, पोलीस शिपाई विनायक सरकुंडे पोलीस शिपाई साचीन खामनकर,निलेश मडावी पोलीस शिपाई सचिन गजभिये यांनी पार पाडली

