विलास केजरकर जिल्हा प्रतिनिधी भंडारा.
भंडारा, दि.३१ मार्च : कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केन्द्र व राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासन मोठ्या प्रमाणात उपाय योजना आखत आहेत व याला वैद्यकीय प्रशासन भरपूर मदत करित आहे . पण सद्यस्थिती पाहता रक्त पेठी मध्ये मोठ्या प्रमाणात रक्ताच्या तफावतीमुळे रक्तची कमी भासत आहे. करिता प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत कपील नगर मित्र परिवार भंडारा व जिल्हा सामान्य रुग्णालय भंडाराच्या वतीने “स्व. वृषभ नान्हे यांच्या प्रथम स्मृती निमित्ताने” कपिल नगर भंडारा येथील ‘प्रज्ञा बोधि विहार’ येथे रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. सदर कार्यक्रम प्रसंगी बाबुराव नान्हे, किशोर दुधपचारे, डॉ. मीरा सोनवाने रक्त संक्रमण अधिकारी, सीमा तिजारे अधिपरिचारीका, लोकेश गोटेफोडे, मयूर खोब्रागडे सामाजिक कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
त्यावेळी उपस्थित मान्यवरांनी विविध मार्मिक उदाहरण देऊन मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सुञ संचालन राकेश कोडापे यांनी केले तर उपस्थितांचे आभार विनित देशपांडे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता संदिप लाडे, विवेक मानकर, विनित देशपांडे, प्रशांत मानकर, नितिन मानकर, प्रवेज कान्हेकर, अश्विन गजभिये, नंदू गेडाम, चंदू चाचेरे, हर्षल टेंभुरकर, निखिल शिंदे, देवेंद्र गजभिये, सौरभ ठवकर, निलेश नान्हे, संदीप बोदनकार, खुशाल बावनकर, दिपक मारबते, राकेश कोडापे, अश्विंन खापर्डे आदी मित्रांनी रक्तदान करुन सहकार्य केले.