पवनी:-पवनी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रशांत पिसे,सचिन पिसे,पंकज रेवतकर यांची आजी आणि सुरेश,विकास,रविंद्र,देवेंद्र,राजेंद्र व यांची आई श्रीमती मंजुळाबाई रामचंद्र रेवतकर वय ९४ वर्ष यांचे आज दुपारी २ वाजता वृद्धपकाळाने निधन झाले.श्रीमती मंजुळाबाई रेवतकर ह्या नगर परिषद पवनी च्या प्राथमिक शाळेच्या निवृत्त मुख्याध्यापिका होत्या.त्यांच्या पश्चात मुली,नातवंड व खूप मोठा आप्तपरिवार आहे.
त्यांचा अंतिम क्रियाक्रम उद्या सकाळी ८ वाजता वैजेश्वर मोक्षधाम येथे होईल.