विकास खोब्रागडे
जिल्हा प्रतिनिधी,चंद्रपुर
चंद्रपुर/-चिमूर तालुक्यातील नेरी जवळच असलेल्या खुटाळा येथे भारतीय सुरक्षा बल ( BSF ) ट्रेनिंग सेंटर चाकूर ( लातूर) येथून सेवानिवृत्त झालेले सैनिक बाळकृष्ण कळाम यांचा सत्कार खुटाळा ग्रामवासी तर्फे करण्यात आला.सेवानिवृत्त सैनिक बाळकृष्ण कळाम यांनी भारतीय सुरक्षा बल ( BSF ) मध्ये 20 वर्ष 7 महिने आपली सेवा दिली. सेवानिवृत्त पूर्वी त्यांनी देशातील काश्मीर, पंजाब, बंगाल, त्रिपुरा, झारखंड या राज्यात आपली सेवा दिली होती.उल्लेखनीय आहे की, 2003 मध्ये जम्मू – काश्मीर येथे घडलेल्या गाजीबाबा प्रकरण प्रसंगी कळाम त्याठिकाणी कार्यरत होते.देशाची रक्षण करणारे सेवानिवृत्त सैनिक बाळकृष्ण कळाम हे सेवा देऊन आपल्या घरी परतले असता खुटाळा येथे त्यांच्या राहत्या घरी संपूर्ण परिवार समवेत ग्रामवासीयांनी शाल,श्रीफळ देऊन सत्कार केला.
याप्रसंगी खुटाळा ग्रा.पं. उपसरपंच विनोद बारसागडे, सदस्य तुलाराम बारसागडे, माजी उपसरपंच गुणवंत गायकवाड, अंकोश कळाम, कोमल श्रीरामे, रमेश गुरुनूले, प्रमोद श्रीरामे, प्रफुल वाघमारे तसेच गावातील संपूर्ण प्रतिष्ठित नागरिक आदी. गावकरी उपस्थित होते.