निकेश जीवतोडे
तालुका प्रतिनिधी समुद्रपूर
कोरा: आज कोरा येथिल बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये एक आगळावेगळाच प्रकार घडला असून एक शेतकरी त्याच्या कर्ज यादीत नाव न आल्याने शेतकरी बँक कर्मचाऱ्यांना कडे विचारपूस करण्यासाठी गेले असता तेथील लिपिक कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांना शिवीगाळ केली आणि त्यांना उद्यड वागणूक दिली या मध्ये शेतकऱ्यांनचा आवाज सुध्दा दाबण्याचा प्रयत्न कुटे तरी केला जात आहे.शेतकऱ्यांच्या भावना समजून घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेणे व त्यांना योग्य ते वागणूक देने गरजेचे आहे.