विलास केजरकर जिल्हा प्रतिनिधी भंडारा.
भंडारा, दि. 3 एप्रिल:- राज्यात या पुर्वीच
भंडारा जिल्हा सामान्य जळीत प्रकरणामुळे चर्चेत आला होता. परत जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये शुक्रवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास ऑक्सिजनच्या टाकीचा स्फोट झाला. तेव्हा कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे आग लगेच विझविण्यात आली. यामुळे मोठी दुर्घटना टळली.
प्राप्त माहीती नुसार
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये ऑक्सिजनच्या टाकीचा स्फोट झाल्याचे लक्षात येताच कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे आग लगेच विझविण्यात आली. यामुळे मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, हा ऑक्सिजनचा पुरवठा कोरोना सेंटरमध्ये केला जात होता.
भंडारा जिल्ह्यात वाढती कोरोना संख्या लक्षात घेऊन कोरोना वार्ड वाढविण्यात आले आहेत. अशाच एका वार्डासमोर शुक्रवारी रात्रीला ऑक्सीजन सिलिंडर लावण्यात आले होते. जवळपास सहा सिलिंडर एका लाईन लावले असता, यातील एका सिलिंडरच्या पाईप लाईन मधून गळती होऊन आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच वार्डातील सुरक्षारक्षकांनी आणि कर्मचाऱ्यांनी मिळून लगेच आगीवर नियंत्रण मिळविले. कोरोना वार्डात उपचार घेत असलेल्या पन्नास रुग्णांना इतर ठिकाणी हलवून त्यांना ऑक्सिजन पुरवठा करण्यात आला. यामुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही हे विशेष.