भंडारा, ६ मार्च २०२१,
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठांतर्गत सर्व संबधीत प्राचार्य, विभागप्रमुख, शिक्षक, व संबधीत विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की, विद्यापीठस्तरावर हिवाळी 2020 ऑन लाईन परीक्षा देते वेळी काही अडचणी आल्या असल्यास किंवा काही कारणास्तव परीक्षेपासुन वंचीत राहील्यास अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या संबधीत ऑनलाईन परीक्षेबददल ज्या त्रुटी असेल अशा त्रुटी त्यांनी महाविद्यालयांच्या प्राचार्यांना संबधीत परीक्षा संपल्यानंतर तिन दिवसाच्या आत सादर कराव्या. विद्यार्थ्यांनी सदर अर्जात आपला मोबाईन नंबर व ई मेल नमुद करणे अनिवार्य आहे. अशा प्रकारचे परिपत्रक विद्यापीठाद्वारे काढले असल्याची माहिती रा.तु.म. नागपुर विद्यापीठाचे सिनेट सदस्य सरिता निंबार्ते यांनी दिली आहे.
सदर त्रृटी महाविद्यालयांनी त्यांना पुरविण्यात आलेल्या ‘कालेज लाॅगिन फाॅर एक्झामिशन फाॅर्म’ मध्ये असलेल्या प्रपत्रात ऑनलाईन माहीती सादर करुन उपरोक्त प्रक्रिया परीक्षापुर्ण झाल्यावर करावी. त्यांनतर संबधीत माहीती परीपुर्णरित्या विद्यापीठाव्दारे पडताळणी करुन या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यासंबधी निर्णय घेवून कळविण्यात येईल याबाबत सर्व संबधीतांनी नोंद घेण्याबद्दल विद्यापीठाने सर्व महाविद्यालयांना कळविले आहे. कोणत्याही विद्यार्थ्याला परिक्षेपासुन वंचित ठेवले जाणार नाही असे सुद्धा सरिता निंबार्ते यांनी सांगितले.