विलास केजरकर जिल्हा प्रतिनिधी भंडारा.
भंडारा, दि. 6 एप्रील:-
दिनांक १० एप्रील २०२१ रोजी आयोजीत केलेली राष्ट्रीय लोकअदालत माननीय महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांचे आदेशान्वये वाढत्या कोरोना संकंटामूळे पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आली. यामुळे भंडारा जिल्हयातील सर्व पक्षकार, वकील व इतर संबंधीतांनी नोंद घ्यावे असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भंडाराचे सचिव न. के. वाळके यांनी केले आहे.