सुधाकर सिडाम /तालुका प्रतिनिधी सिरोंचा
सिरोंचा -:कोरोनाच्या वाढता संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कडक निर्बंध लागू केल्या आहेत शासनाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने अमलबजावणी सुरु केली सिरोंचा येथे तालुका प्रशासनाच्या वतीने प्रभारी तसीलदार सय्यद हमीद व मुख्याधिकारी विशाल पाटील यांनी गस्त घालून नागरिकांना मास्कचा वापर करण्याचे आवाहन केले तसेच विनामास्क फिरणाऱ्या लोकांवर कारवाई केली कोरोनाचा विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने नागरिकांनी काढजी घ्यावा व नियमाचे पालन करणे अत्यावश्यक कामासाठीच बाहेर पडावे बाहेर पडताना मस्कचा वापर करावा असे आदेश जिल्हाधिकारी दिले आहेत यांचा अनुषंगाने प्रभारी तसीलदार सय्यद हमीद व नगरपंचायत मुख्यधिकारी विशाल पाटील व कर्मचाऱ्यांनी शहरातील प्रत्येक चौकात स्वतः फिरून पाहणी केली तसेच नागरिकांना मस्कचा वापर करण्याचे आवाहन केले आहे राज्यात जमावबंदी असल्याने सकाळी 6 ते रात्रौ 8 वाजेपर्यंत 5 पेक्षा जास्ता लोकांनी एकत्र येऊ नये तसेच रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीने विनाकारण बाहेर पडू नये वैद्यकीय व इतर आवश्यक सेवा वगडता नागरिकांनी गर्दी करू नये आरोग्याबाबत दक्षता घ्यावी असे आवाहन प्रभारी तसीलदार सय्यद हमीद व मुख्यधिकारी विशाल पाटील यांनी केली