विजय शेवाळे
तालुका प्रतिनीधी.परंडा
परंडा-दि.6एप्रिल उस्मानाबाद शहरात इंदिरानगर परिसरातील सांजा रोड वर दोन मित्रात दारुच्या नशेत वाद होऊन बरगाडीत चाकू खूपसून खून झाल्याने एकच खळबळ उडाली आहे .याबाबत अधिक माहिती अशी की उस्मानाबाद येथील विशाल राम बंडकर वय 20 वर्ष याला बरगाडीत चाकू खूपससून प्रेम राजेंद्र आयवळे याने खून केला. दोघे मित्र होते दारूच्या नशेत दिनांक दि.05-04-2021 रोजी इंदिरा नगर मध्ये सांजा रोड वर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास वाद घालत होते त्याच दरम्यान की घटना घडली आयवळे याने बंडगर याच्या बरगडात चाकू मारला त्यात रक्तस्राव जास्त झाल्याने उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून प्रकृती गंभीर असल्यामुळे पुढील उपचारासाठी सोलापूरच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले होते परंतु रक्तस्राव झाल्यामुळे बीपी लो होऊन दि.06-04-2021 रोजी पहाटे तीन वाजता मयत घोषित करण्यात आले याबाबत उस्मानाबाद शहर पोलिसांनी मयताचा मरणापूर्वी जबाब घेऊन शहर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला उस्मानाबाद शहर पोलिसांनी अटक केली आहे घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर सुर्वे हे करत आहेत.