विलास केजरकर जिल्हा प्रतिनिधी भंडारा.
भंडारा, दि. 6 एप्रील:- भंडारा जिल्हा परिषद अंतर्गत प्रस्तावित अनुकंपा पद भरती प्रक्रिया अत्यंत कासव गतीने सुरू असल्यामुळे त्याचा फटका वयस्कर उमेदवारांना बसत आहे. बहुतांश उमेदवारांची वयोमर्यादा संपत असल्यामुळे त्यांच्यावर अन्याय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भंडारा जिल्हा परिषद अंतर्गत अत्यंत कासव गतीने सुरू असलेली अनुकंपा पद भरती प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करून पात्र उमेदवारांना तत्काळ नियुक्ती आदेश द्या. अन्यथा, तीव्र स्वरूपाचे पँथर स्टाईल आंदोलन छेडण्याचा इशारा रिपब्लिकन पँथर संघटनेचे जिल्हाध्यक्ष माधवराव नारनवरे यांनी एका लेखी निवेदनाद्वारे भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सदाशिव मुन व सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पानझडे यांना दिला आहे.