सागर मूलकला / उपजिल्हाप्रतिनिधी गडचिरोली
अहेरी :- अहेरी राजनगरीचे आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणी देवस्थान, अहेरीचे व्यवस्थापक तथा नवयुवक भजन मंडळाचे अध्यक्ष सत्यनारायण नामेवार यांचे काही दिवसांपूर्वी दुःखद निधन झाले होते, काल माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव महाराज ह्यांनी त्यांच्या राहत्या घरी सांत्वना भेट दिली, ह्यावेळी त्यांच्या कुटुंबीयांशी राजे साहेबांनी आस्थेने संवाद साधून त्यांचे सांत्वन केले. सत्यनारायण नामेवार यांनी अहेरी राज परिवाराच्या मालकीचे विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे गेली ४० वर्ष अविरत सेवा केली आहे, दरवर्षी होणाऱ्या विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळा कार्यक्रमात त्यांच्या सक्रिय सहभाग असायचा, त्यांचे हे योगदान अहेरी राज परिवार कधीही विसरणार नाही, त्यांच्या निधनानंतर त्यांच्या परिवाराला पोरके होहू दिले जाणार नाही, शक्यतो सर्व ती मदत त्यांच्या परिवाराला केली जाईल असे आश्वासन ह्यावेळी नामेवार कुटुंबीयांना माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी दिले. ह्यावेळी युवा नेते कुमार अवधेशराव बाबा तसेच भाजपा आणि विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळा समिती अहेरीचे पदाधिकारी उपस्थित होते.