विजय शेवाळे
तालुका प्रतिनिधी.परंडा
परंडा:- भारतीय माहिती अधिकार समूह आणि परंडा येथील नागरिक यांच्या संयुक्त विद्यमाने सदरील निवेदन जिल्हाधिकारी साहेब यांना देण्यात आले या निवेदनात उपजिल्हा रुग्णालय परंडा यांच्याकडून जाणून बुजून रुग्णांची हेळसांड करण्यात येत आहे व मिरवणूकही करण्यात येत आहे यासाठी हे निवेदन देण्यात आले या निवेदनात परंडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या सर्वसामान्य व गरीब जनतेला मूलभूत सोयीसुविधा दिल्या जात नाहीत त्या ठिकाणी पिण्याचे पाणी अस्वच्छ असून परिसरातही दुर्गंधी पसरली आहे तसेच रक्त व लघवी च्या ज्या तपासण्या करावयाच्या आहेत त्या सर्व तपासण्या करण्याची लॅब बंद असून आपण सदरील तपासणी खाजगी दवाखान्यातून करून घ्या मगच आम्ही उपचार करू अशाप्रकारे गोरगरीब जनतेची अडवणूक केली जात आहे.
कोरोनाच्या महामारी मुळे रोजगार गेलेल्या जनतेला हा अधिकचा भुर्दंड सहन करावा लागत आहे आणि नाहक त्रास आला सामोरे जावे लागत आहे तरी मेहरबान साहेबांनी या गोष्टीत तात्काळ लक्ष घालून जनतेची होणारी हेळसांड थांबवावी यासाठी हे निवेदन देण्यात आले तसेच उपजिल्हा रुग्णालय परंडा येथील डॉक्टरांचे व खाजगी रुग्णालय यांचे काही आर्थिक साटेलोटे तर नाही ना याचीही कुजबूज जनतेतून ऐकावयास मिळत आहे सदर निवेदनाची तात्काळ दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी अशी विनंती जिल्हाधिकारी साहेब यांना करण्यात आले आहे