लॉक डाऊन म्हणजे फक्त व्यापाऱ्यांनाच काय असा प्रश्न उपस्थित.
योगेश्वर शेंडे
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर
चिमूर (०८ एप्रिल)-कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्या करिता महाराष्ट्र सरकारने सुरू केलेला वीकेंड लॉक डाऊन म्हणजे फक्त व्यापाऱ्यांच्या मानेवर तलवार आहे. सर्व शासकीय यंत्रणा सुरू आहे. निवडणुका सुरू आहे त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून तिथे कोरोनाचा प्रादुर्भाव होत नाही काय ? असा प्रश्न उपस्थित करून कोरोना ला रोखण्याचे सरकारचे धोरण चुकीचे आहे. यामुळे लॉक डाऊन चा सर्वात मोठा फटका व्यापाऱ्यांना बसतो करिता शासनाने लॉकडाऊन बंद करावा याकरिता बालाजी महाराज बहुउद्देशीय व्यापारी मंडळ चिमूर च्या शिष्टमंडळाने उप विभागीय अधिकारी (महसूल) कार्यालय चिमूर यांची आज दिनांक 8/4/2021 रोज गुरुवार ला प्रत्यक्ष भेट घेऊन लॉक डाऊन मुळे व्यापाऱ्याना भेडसावनाऱ्या समस्या बाबत चर्चा करून व अवगत करून लॉक डाऊन बंद करण्यात यावे असे निवेदन देण्यात आले. शिष्टमंडळात व्यापारी मंडळाचे अध्यक्ष मा.प्रकाश जी बोकारे, सचिव सारंग दाभेकर, सहसचिव पप्पु शेख, कोषाध्यक्ष प्रदीप साटोने,संचालक दिलीप राचलवार व गजाननजी शिंदे उपस्थीत होते.