सरपंच तुलसीदास शिवरकर माजी सरपंच महादेव कोकोडे ग्रामसेवक तरारे यांच्या हस्ते भूमिपूजन.
योगेश्वर शेंडे
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर
चिमूर (०८एप्रिल)- नेरी वरून जवळ असलेल्या नवतला येथे आज दि 8 एप्रिलला तेली मोहल्ला परिसरात तेली समाज मंदीर बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले तसेच महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत नवतला येथील गावाजवळ आणि शेती परिसरात लागून असलेल्या तलावा च्या खोलीकरण कामाला सुरवात झाली असून नवतळा येथील सरपंच तुळशीदास शिवरकर माजी सरपंच महादेव कोकोडे ग्रामसेवक तरारे यांच्या हस्ते भूमिपूजन करून आज दि 8 एप्रिल ला कामाला सुरुवात करण्यात आली.नवतळा येथे मागील अनेक वर्षांपासून तेली समाज तेली मंदिर पासून उपेक्षित होते त्यांनी अनेकदा मागणी केल्यामुळे हा समाज मंदिर मंजूर होऊन बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले तसेच रोजगार हमी कामामुळे तलावा लगत लागून असलेल्या शेतीच्या पाण्याची पातळी वाढ होईल.जंगल लागून असल्यामुळे प्राणी पक्षी यांना फायदा होईल. शिवारात पाण्याची पुरेशी उपलब्धता असावी यासाठी तलावाचे खोलीकरण करण्यात येत आहे तसेच पाणी हे पुर्न उन्हाळ्याभर राहीला पाहिजे आणि जंगली प्राण्यांची तहान भागली पाहिजे हाही उद्देश ठेवून हा खोलीकरनाचा काम केले जात आहे. सदर काम हे कोरोना चे शासकीय नियम पाळून केले जात आहे यात सर्व मजूर नागरिक सामाजिक अंतर ठेवून काम करीत आहेत आणि स्वतःची काळजी स्वतः घेत असून रोजगारासाठी काम करीत आहेत. यावेळी भूमिपूजन कार्यक्रम ला शामराव तुमराम ग्रा प सदस्य पुंडलिक मेश्राम सोमेश्वर नागोसे सूर्यभान भजभूजे लक्ष्मण नागोसे उपासराव शेंडे गुलाबराव कैकाडे बंडू देव्हारे कैलास नागोसे शुभम पारखी जैराम देव्हारे भारत साफेकर अकबर रामटेके रामचंद्र जेंगटे श्रीधर गावतुरे आनंदराव शेंडे रोजगार सेवक ग्राम पंचायत कर्मचारी वर्ग,, गावातीलअनेक मजूरांची उपस्थिती होती