जांभुळघाटच्या ज्युनियर संजय दत्तची व्यथा
योगेश्वर शेंडे
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर
चिमूर (०८ एप्रिल)-चिमूर क्रांती भूमीतील जांभुळघाट येथील नाट्यकलावन्त शेख महम्मद सय्यद महमद खान उर्फ शेरुखान यांना ज्युनियर संजय दत्त असेही संबोधले जातात. शेरु खान (ज्युनियर संजय दत्त) हे नाट्यकलावंत असून, त्यांची एक बहीण शबाना खान हि सुद्धा नाट्यकलावंत असून, झाडीपट्टी रंगभूमी वडसा (देसाईगंज) येथे मागील 35 वर्षांपासून झाडीपट्टी रंगमंचकावर काम करीत आहेत. मागील काही वर्षात चिमूर येथे सिने कलावंत सुनील दत्त हे कांग्रेस पक्षाचा प्रचार करण्यासाठी आले होते. त्यावेळी सुनिल दत्त यांचे स्वागत करण्यासाठी नाट्यकलावंत शेरु खान हे गेले होते. तेव्हा नाट्यकलावंत शेरु खान यांना ज्युनियर संजय दत्त म्हणून नाटकात छबी होती. त्यावेळी शेरु खान हुबेहूब संजय दत्त सारखे दिसत होते. त्यावेळी संजय दत्त यांना जेल झाली होती. ते तुरुंगात होते. मात्र नाट्यकलावंत शेरुखान यांना पाहून सुनील दत्त भारावून गेले होते. त्यावेळी सुनील दत्त यांनी शेरु खान ला कांग्रेसच्या प्रचाराच्या वेळेला व्यासपीठावर आपल्या जवळ बोलवून घेतले व तू मेरे बेटे जैसा दिखता है! असे म्हणून सुनिल दत्त चे मन भारावून गेले होते. यावेळी नाट्य कलावंत शेरु खान यांना दिव्यांग या मराठी चित्रपटात काम काम केले असून त्या चित्रपटाला पुरस्कार सुधा मिळाले आहेत, चित्रपटात काम करण्यासाठी सुनिल दत्त यांनी मुंबईला येण्याची ऑफर दिली होती. मात्र ती ऑफर शेरु खान यांनी फेटाळून लावली. व मी माझे स्वतःचे जन्मगाव कधीच कुठं सोडून जाणार नाही असे, सुनिल दत्त यांना सरळ सांगितले. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु असल्याने यावर्षी कुठंच झाडीपट्टीतील नाटकं झालेली नाहीत. यामुळं झाडीपट्टीत नाटकात काम करणारी नाट्य कलावंत यांच्या हाताला काम नसल्याने, नाट्य कलावंत व त्यांच्या कुटूंबियाची उपासमार होत आहे. शासनाने झाडीपट्टीतील नाट्य कलावंतांना मदत द्यावी अशी मागणी झाडीपट्टीतील नाट्य कलावंतांनी शासनाला निवेदन देऊन सुद्धा केली असल्याची माहिती शेरु खान यांनी दिली. हाताला कोणतेही काम नसल्यामुळं नाट्य कलावंत व ज्युनियर (संजय दत्त) शेरु खान यांनी जाभुळघाट येथे स्वतःच्याच गावात समोसा, कचोरी, नास्ता ची दुकान थाटली असून, या कामात त्यांची सहचरनी पत्नी व मुलगा मदत करतो आहे.