राजअनिल पोचमपल्लीवार
विदर्भ संपादक गडचिरोली
सिरोंचा:- पातागुडम कडून सागवान भरून वाहन येत असल्याची गोपनीय माहितीचा आधारे वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय असरअल्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सागवान तस्करी करणारा वाहनाचा पाठलाग करून असरअल्ली-अंकीसा गावाचा मधात सागवान तस्कर करणारा वाहनाला पकडले.
सविस्तर माहिती असे की, आज रात्री पातागुडम कडून सागवान भरून येणारा टवेरा वाहन क्रमांक AP 15 TV 0161 वाहनाला पकडून जळती केले असता टवेरा वाहनांमध्ये 20 नग सागवान सिलपाटे आढळले आहेत. मिळालेले सागवान एक घनमीटर असून अंदाजे किंमत 70 हजाराचे सागवान असून वाहन जप्त केल्याचे माहिती असरअल्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी दिले आहे. वाहन जप्त करण्यात वन कर्मचाऱ्यांना यश आले पण वन तस्करांना पकडण्यात वन विभाग अपयश ठरले असुन घटनास्थळावरून दोन आरोपी फरार झाले असून त्यांचे शोध सुरू आहे. सदर घटनेची कार्यावाही वन विभाग सिरोंचाचे उपवनसंरक्षक सुमितकुमार व सहाय्यक वनसंरक्षक एस.जी.बडेकर सिरोंचा यांच्या मार्गदर्शनाखाली असरअल्ली वन परिक्षेत्र अधिकारी चेतन पाटील, वन रक्षक ए.बी.इरकीवार, पी.के.कोठारे, वाघाडे, कु.पी.व्ही.पोयावी, एस.सी.वेलादी आणि सर्व वनरक्षक व महेश दुब्बालासह अनेकांनी अथक परिश्रम घेतले. या घटनेची पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी चेतन पाटील करत आहे.