महेश निमसटकर
शहर प्रतिनिधी भद्रावती
भद्रावती दि. 12:-येथील शाॅवली टेंपल्स कुंग-फू कराटे स्कुलचा विद्यार्थी यश अरूण लांडगे याने नुकत्याच वरोरा येथील बालाजी सभागृहात पार पडलेल्या पस्तीस ते चाळीस किलो वजन गटातील कराटे स्पर्धेत यश प्राप्त केले आहे.
वरील स्पर्धेत त्याला रौप्य पदक प्राप्त झाले आहे. तो येथील मॅकरुन शाळेचा विद्यार्थी आहे. तो आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, मास्टर राकेश दिप, मास्टर शितल तेंलंग, प्रशिक्षक बबलू मरस्कोल्हे यांना देतो.