सरपंच अजय आत्राम यांच्या हस्ते नवीन हातपंपाचे भूमीपूजन…
सुधाकर सिडाम /तालुका प्रतिनिधी सिरोंचा
सिरोंचा:- तालुक्यातील ग्राम पंचायत वेंकटापूर अंतर्गत येणाऱ्या ग्लासफोर्डपेठा येथील भोई वार्डात पाण्याचे समस्या निर्माण झाली होती.
पाण्याची समस्या लक्षात घेत ग्राम पंचायत वेंकटापुरचे सरपंच अजय आत्राम यांनी आदिवासी विध्यर्थी संघटनेचे सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम यांना ग्लासफोर्डपेठा येथील भोई वार्डात पाण्याची समस्या असल्याची माहिती दिले.
उन्हाळ्याच्या दिवस असल्याने पाण्याचे पातळी खाली घेल्याने पाणीटंचाई निर्माण होत आहे. भोई वार्डातील पाण्याचा समस्या दूर करण्यासाठी स्वतः आविस अध्यक्ष जनगाम यांनी आपल्या स्वखर्चाने ग्लासफोर्डपेठा येथील भोई वार्डात नवीन हातपंप देऊन सरपंच अजय आत्राम यांचे हस्ते आज भूमिपूजन करून हातपंप खोदण्याचा कामला सुरवात करण्यात आली आहे.
ग्लासफोर्डपेठा येथील भोई वार्डात नवीन हातपंपाचे काम सुरू झाल्याने येथील पाणी टंचाई दूर होत असल्याने वार्डातील नागरिक आविस अध्यक्ष बानय्या जनगाम व सरपंच आत्राम यांच्या आभार मानले आणि आनंद व्यक्त केले आहे. यावेळी ग्राम पंचायत वेंकटापूरचे उपसरपंच मंजुळा दिकोंडा,सदस्य दुर्गाय्या तलंडी,माजी उपसरपंच वेंकटी कार्सपल्ली, माजी ग्रा.पं. सदस्य रोहन अल्लुरी,तिरुपती येदासुला,सतीश जिल्हापेल्ली,राजेश गग्गुरी,येराय्या बोगटा,बापू बोगटा,वेंकटस्वामी पानेम,रामाना,राजू बद्दी,किष्ठाय्या गग्गुरी,राजेश बोगटा,समय्या गंगनाबोईना,मालय्यासह भोई वार्डातील अनेक आविस कार्यकर्ते उपस्थित होते.