विजय शेवाळे
तालुका प्रतिनिधी.परंडा
परंडा: दि.13एप्रिल तालुक्यातील शेळगांव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कोरोना प्रतिबंधकन लसीकरण जोमाने चालु आहे तसेच लसीकरण 45 वर्षावरील नागरिकांना करण्यात येत आहे तरी आता पर्यंत शेळगांव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये स्त्री व पुरुष असे 789 नागरिकांने लसीकरण केले आहे
तसेच शेळगाव मध्ये 263 चिंचपुर बु 143 तांदळवाडी 141 ईनगोंदा 80 वाटेफळ 85 या ऊपकेंदातील नागरिकांनी लस घेतली आहे परंतु सध्या लसीकरणासाठी लस कमी पडत आहे तरी प्रशासनाने जास्तीत जास्त लस उपलब्ध करावी असे नागरिकांतुन बोलले जात आहे यावेळी डॉ.बालाजी भोसले म्हणाले की जे नागरिक 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी लसीकरणासाठी यावे व येताना आधारकार्ड किंवा मतदान कार्ड घेऊन यावे व जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करण्याचे आवाहन केले आहे यावेळी वैद्यकिय अधिकारी डॉ.बालाजी भोसले,आरोग्य सहाय्यीका एस.एस. गवले, आरोग्य सेविका भिल्लारे एम.एस.स्टाफ नर्स गवळी एस.एस. आरोग्यसेवक जाधव एस.एस.परिचर शेवाळे एल.एन.आदीसह नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.