राजअनिल पोचमपल्लीवार
विदर्भ संपादक गडचिरोली
सिरोंचा – गडचिरोली जिल्हयातील वाढती कोरोना रूग्ण संख्या व वाढता मृत्युदर लक्षात घेता ज्या आरोग्य विषयक समस्या निर्माण झाल्या आहेत त्यावर मात करण्यासाठी शेजारच्या तेलंगणा राज्यातील मांचेरियाल, कारीनगर, चेन्नुर, भूपालपली, गारेपेल्ली या ठिकाणचे हॉस्पीटल्स गडचिरोली जिल्हयातील सिरोंचा तालुक्यातील रूग्णांसाठी उपलब्ध करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी तेलंगणा सरकारशी चर्चा करावी अशी मागणी नगर पंचायत सिरोंचा चे माजी सभापती सतीश भोगे यांनी मागणी केली आहे.
शेजारच्या तेलंगणा राज्यात गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा येथून चेन्नूर 20 किमी, मांचेरियाल 60 किमी गारेपल्ली 30 किमी, भूपालपल्ली 75किमी अंतरावर असून येथून हैद्राबाद जवळ पडत असल्याने आणि तेलंगणा राज्याचे राजधानी आहे. याठिकाणी रूग्णसंख्या अतिशय कमी असल्यामुळे सदर हॉस्पीटलमध्ये मोठया प्रमाणावर बेडस् उपलब्ध आहेत, डॉक्टर्स व आरोग्य कर्मचारी उपलब्ध आहेत. ऑक्सीजनची पाईपलाईन उपलब्ध आहे, रेमिडीसीवीर इंजेक्श्न वगळता अन्य सर्व आरोग्य सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे. याठिकाणचे हॉस्पीटल्स गडचिरोली जिल्हयातील सिरोंचा तालुक्यातील रूग्णांसाठी उपलब्ध झाल्यास कोरोना आटोक्यात येण्यास मोठी मदत होईल. शासनाने या गोष्टीवर गंभीऱ्याने विचार करून सिरोंचा तालुक्यातील कोरोना रुग्णांना तेलंगणा राज्यातील सरकारी दवाखान्यात भरती केले तर अनेक रुग्णांचे जीव वाचू शकेल,याद़ष्टीने नियमातील तरतुदी तपासुन तेलंगणा सरकारशी सामंजस्य करार करावा व तेलंगाणा राज्यातील चेन्नुर, मांचेरियाल, करीमगर, गारेपल्ली, भूपालपल्ली येथील हॉस्पीटलमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील कोरोना रुग्णासाठी उपलब्ध करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगर पंचायत माजी सभापती सतीश भोगे यांनी केली आहे.