विलास केजरकर
जिल्हा प्रतिनिधी भंडारा
भंडारा,दि. 14 एप्रिल:-
भारतीय संविधानाचे शिल्पकार, विश्वभुषण, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती भंडारा येथील पोलीस स्टेशन येथे अत्यंत साध्या पद्धतीने, कोरोना प्रोटोकॉलकालचे पालन करून साजरी करण्यात आली. covid-19 कोरोनाव्हायरसच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. त्यावेळी भंडारा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास कानसे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलित करून अभिवादन केले. त्याप्रसंगी भंडारा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी उपस्थित होते. यावेळी आंबेडकर कर्मचा-यांनी सामाजिक अंतर राखत व कोरोना प्रोटोकॉल पाळून बाबासाहेबांना आदरांजली वाहिली.
कर्मचा-यांनी बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांच्या माध्यमातुन नविन क्रांती केली त्याप्रमाणे आपण सुध्दा मुलां- मुलींना सुध्दा पुस्तके वाचण्यास प्रवृत्त करावे त्यामुळे पाहिजे त्या पदावर भरारी मारता येते असे प्रतिपादन भंडारा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास कानसे यांनी केले.