सुधाकर सिडाम /तालुका प्रतिनिधी सिरोंचा
सिरोंचा-: तालुक्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव पाहता ,आज दि.२९ एप्रिल २०२१ पासुन ग्राम पंचायत पेंटिपाका कडून गसोडियम हायपोक्लोराईड जंतुनाशक फवारणी सुरु केले आहेत. आज रोजी ग्रा.प अंतर्गत येणाऱ्या माणिक्यापुर गावात फवारणी करण्यात आले आणि पुढील दोन दिवसात पेंटीपाका ग्रामपंचायतील येणारी प्रत्येक गावात फवारणी करण्याची ग्राम पंचायत कडून सांगण्यात येत आहे, तसेच फवारणी करताना पेंटीपाका ग्राम पंचायत चे उप सरपंच शंकर नरहरी यांनी सांगितले कि देशातराज्यात वाढत्या करोना प्रादुर्भाव काळात कोणीही अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडु नये , आणि सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊ नये, मास्क आणि सॅनिटाईजर ची वापर करावे असे त्यांनी सांगितले ,
त्यावेळी उपस्थित ग्राम सेवक – कोलाटकर , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते – गौतम वेंकटेश्वर राव,ग्राम पंचायत कर्मचारी राजेश गौतम, सुधाकर लग्गा तसेच माणिक्यापूर गावातील गावकरी उपस्थित होते