विलास केजरकर जिल्हा प्रतिनिधी भंडारा.
भंडारा , दि. ५ मे :- कामगार वर्गाला, दलित शोषितांना व समग्र श्रमिक जनतेला दडपशाही व शोषनाच्या जोखडातून मुक्त होण्याचा मार्ग दाखवणारा महान विचारवंत कार्ल मार्क्स हा शास्त्रीय समाजवादाचा जनक होता असे विचार त्यांच्या जयंती प्रित्यर्थ भाकपचे जिल्हा सचिव व माजी नगरसेवक काॅ.हिवराज उके यांनी व्यक्त केले.
ते 5 मे 2021 ला सकाळी 11 वाजता भाकप कार्यालय राणा भवन भंडारा येथे कम्युनिस्ट मॅनिफेस्टोचे (कम्युनिस्ट जाहिरनामा) रचयीता कार्ल मार्क्स यांच्या 203 व्या जयंतीनिमित्त बोलत होते.
कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय मानवाधिकार समितीचे अध्यक्ष काॅ.रतन मंत्री यांच्या हस्ते व भाकपचे जिल्हा सचिव काॅ. हिवराज उके व किसान सभेचे अध्यक्ष काॅ.सदानंद इलमे यांच्या प्रमुख उपस्थितीत माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी काॅ. हिवराज उके यांनी कार्ल मार्क्स व मार्क्सवादा बद्दलचे विचार व्यक्त करताना म्हणाले “क्रांतिकारक तत्त्वज्ञाना शिवाय, क्रांतिकारक व्यवहार शक्य नाही”, ही मार्क्स ची शिकवण होती.
धर्म ही अफूची गोळी आहे हे मार्क्सचे धर्माविषयक जगातील सर्वात जास्त प्रसिद्ध असलेले वाक्य असावे. पण त्याचे भाषांतर बरोबर नाही. ते म्हणतात “वास्तव जीवनातील दुःख आणि संकटे विसरण्यासाठी लोक गुंगी येणाऱ्या अनेक पदार्थांचे सेवन करतात, आधार घेतात, धर्मश्रद्धेचा आधार हा असाच आधार आहे.अशीच गुंगी आणणारी जाणीव आहे. म्हणून कार्ल मार्क्स म्हणतो,” धर्म ही लोकांची अफू” असते.
आज जगासमोर जे काही प्रश्न आहेत ते सोडवायचे असतील तर समाजवादाचा शिवाय पर्याय नाही,जे आपले घटनात्मक मूल्य सुद्धा आहे.
मार्क्सने” कम्युनिस्ट जाहिरनाम्यात “या सर्वांचे विवेचन केले आहे.त्याचे अध्ययन करण्याची आज नितांत गरज आहे. म्हणूनच जगभरातील प्रमुख भाषेत त्याचा अनुवाद झाला आहे.
ब्राह्मणेतर चळवळीचे थोर नेते ई.व्ही. रामास्वामी पेरियार ने त्यांच्या “कुडी आरासू” या साप्ताहिकात तामिळ भाषेत “समा धर्म अरिकल्ल” या शीर्षकाखाली पाच अंकात कम्युनिस्ट मॅनिफेस्टो प्रसिद्ध केला होता आणि रशिया च्या अगोदर भारतात मार्क्स यायला पाहिजे होता असे त्याने लिहिले होते. बंगाली भाषेत काॅ. मुजफ्फर अहमद, मौलाना अबुल कलाम आझाद तसेच अब्दुल बारी यांनी लाहोर मधून उर्दूत प्रकाशित केले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कम्युनिस्ट मॅनिफेष्टोचे वाचन करावे असे म्हटले, एवढेच नाही तर त्यांनी मार्क्स आणि बुद्धा लिहले.
काॅम्रेड कार्लं मार्क्स यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी प्रमुख्याने काॅ. हिवराज उके, काॅ. सदानंद इमले, रतन मंञी, वामनराव चांदेवार, गौतम भोयर, मूकेश दुरगुडे , राहुल सत्तरावे, रोहित नागोसे, दिलीप क्षीरसागर इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते.