अशोक इंगळे शहर प्रतिनिधी लोणार दिनांक 5मे
कोरोना च्या पार्श्वभूमीवर
लोणार शहराचे वैभव असणाऱ्या दुर्गा टेकडीवर गेल्या 35 वर्षापासून लोणार येथील ज्येष्ठ नागरिक पुंडलिकराव मापारी यांच्या श्रमदानातून आज रोजी दुर्गा टेकडी वर हजारो झाडांची निगा राखून िवंत ऑक्सिजन पाहावयास मिळत आहे शासन एकीकडे झाडे लावा झाडे जगवा हा नारा देत नागरिकांमध्ये जनजागृती करत असताना लोणार येथील ज्येष्ठ व्यक्ती आज रोजी दुर्गा टेकडी चे संगोपन करीत आहेत शासनाने याची दखल घेत या दुर्गा टेकडी ची काळजी घेण्याचे आवाहन पुंडलिक दादा करीत आहेत या वृक्षांची दखल घेत शैलेश दादा सावजी यांनी लोणार येथे येऊन 85 वर्ष वयाचे पुंडलिकराव मापारी यांचा दुर्गा टेकडीवर येऊन शाल श्रीफळ देऊन सत्कार केला व त्यांच्या त्यागाचे व वृक्ष संवर्धनाचे कौतुक केले त्यांचे समाजसेवेचे व्रत पाहून ते भारावून गेले यांचा आदर्श इतरांनी घ्यावा असे म्हणून मनोगत यावेळी व्यक्त केले आजूबाजूचा परिसर हा झोपडपट्टी व तसेच इतर शासकीय कार्यालय असून दुर्गा टेकडी जपणे ही तेवढेच महत्त्वाचे असल्याचे मत मापारी यांनी व्यक्त केले दुर्गा टेकडी च्या आजूबाजूला वृक्षतोड होऊ नये यासाठी त्यांची नेहमी काळजी असते यावेळी प्रमुख उपस्थिती नारायण मामा जुमडे आप्पा साखळकर विष्णू पाटील पळसकर हे हजर होते विनायक गोपाळराव मापारी यांनी त्यांचे आभार मानले