न.प. कर्मचारी, राज्य परिवहन महामंडळ कर्मचारी यांच्यासह ४० रक्तदात्यांनी केले रक्तदान.
सचिन संघई जिल्हा प्रतिनिधी वाशिम
वाशिम : कारंजा येथील कामाक्षा देवी मंदिर सभागृहात दिनांक ९ मे २०२१ रोजी सकाळी ९ ते २ या वेळेत स्थानिक परिवर्तन बहुद्देशीय संस्था आणि श्री छत्रपती प्रतिष्ठान अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने महाराणा प्रताप यांच्या तारखेनुसार ४८१ व्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात परिवर्तन बहुद्देशीय संस्था श्री. छत्रपती प्रतिष्ठान अकोला यांनी आपले सामाजिक दायित्व जोपासले. कोरोना सारख्या महामारीच्या संकटात ऑक्सिजनच्या तुटवडयाने भर टाकली होती आणि नुकतेच १८ ते ४४ या वयोगटातील व्यतींसाठी शासनाने कोविड १९ चे लसीकरण सुरु केले; लसीकरणाच्या नंतर कमीत कमी १४ ते २८ दिवस रक्तदान करू शकत नाही, आणि २८ दिवसांनी कोविड १९ लसीचा दुसरा डोस घ्यावा लागतो दरम्यान आपल्या प्रियजनांना रक्ताचा तुटवडा भासू नये हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून रक्तपेढीमधील रक्तसाठा वाढविण्यासाठी रक्तदान करून ४० रक्तदात्यांनी सक्रीय सहभाग नोंदवला ज्यात शुभम सोळंके यांनी दिनांक १०/०५/२०२१ रोजी आपल्या वाढदिवसानिमित्य रक्तदान केले. यात प्रत्येक रक्तदात्यांना अंकुर सिड्स नागपूरतर्फे कॉलेज बॅग प्रोत्साहन पर भेट म्हणून देण्यात आल्या.शिबिराच्या यशस्वीतेसाठी परिवर्तन बहुदेशीय संस्था कारंजा, श्री छत्रपती प्रतिष्ठान अकोला, अंकुर सिड्स नागपूर तसेच सर्व मित्र परिवार यांच्या पदाधिकार्यांनी अथक परिश्रम घेतले.
परिवर्तन बहुद्देशीय संस्था कारंजा लाड, श्री छत्रपती प्रतिष्ठान अकोला आणि साई जीवन रक्तपेढी अकोला यांचे वतीने सर्व रक्तदाते तसेच डॉक्टर डोंगावकर व कर्मचारी यांचे आभार मानले.