संजीव बडोले
जिल्हा प्रतिनिधी गोंदिया.
नवेगावबांध दि.1सप्टेंबर:-अर्जुनीमोर विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे यांनी दि.31 ऑगस्ट रोजी अर्जुनी मोर. तहशिल कार्यालय व पंचायत समिती मधे विविध विभागाचा विकास कामांचा आढावा घेतला. सध्या कोरोना महामारीचे संकट संपुर्ण देशात असुन लाॅकडाऊन मुळे अनेक विकास कामे प्रलंबित आहेत.त्यामुळे सर्वसामान्य जनतेची होणारी गैरसोय लक्षात घेता विकास कामांसंदर्भात प्रलंबित प्रकरणांचा त्वरीत निपटारा करा असे निर्देश आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे यांनी तहशिलदार विनोद मेश्राम, व गटविकास अधिकारी मयुर अंदेलवाड तथा विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांना दिले.
पंचायत समिती अर्जुनी मोर येथे प्रधानमंत्री आवास योजना, रमाई,शबरी,आवास योजनांचे देयके निधीअभावी अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत.त्या संदर्भात आपले शासनस्तरावर प्रयत्न सुरु आहेत.लवकरच आवास योजनेचा निधी पं.स.स्तरावर पोहचनार आहे. निधी आल्याबरोबर सर्व प्रलंबित देयके त्वरित देण्याच्या सूचना आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे यांनी दिल्या. यावेळी पंचायत समिती स्तरावरील विविध विकास कामाचा आढावा संबंधित अधिकाऱ्यांनी आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे यांचे समोर मांडला. यावेळी चंद्रिकापुरे यांनी विविध विकास कामासंदर्भात आवश्यक त्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. त्याचप्रमाणे तहसील कार्यालय अर्जुनी-मोर येथे तहसीलदार विनोद मेश्राम यांचेकडून ही विकास कामाचा आढावा घेतला .यावेळी केसरी राशन कार्ड व अन्य बाबतीत जनतेला मिळणारे राशन नियमित देण्यात यावे, नवीन राशन कार्ड बनविण्यासंदर्भात आवश्यक त्या सूचना दिल्या .त्याच प्रमाणे संजय गांधी व श्रावणबाळ या निराधार योजनेतील लाभार्थ्यांची प्रलंबित,त्याच प्रमाणे संजय गांधी व श्रावणबाळ या निराधार योजनेतील लाभार्थ्यांची प्रलंबित प्रकरणाविषयी सखोल चर्चा झाली. वनहक्क जमिनीच्या दाव्या संदर्भात आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी संबंधित यंत्रणांना मार्गदर्शक सूचना दिल्या. यावेळी तहसीलदार विनोद मेश्राम सर्व नायब तहसीलदार गटविकास अधिकारी मयुर अंदेलवाढ व विविध विभागातील अधिकारी कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते .आढावा बैठकीत लोकपाल गहाणे, यशवंत गणवीर, आर .के .जांभुळकर चित्रलेखा मिश्रा, माधुरी पिंपळकर, रतिराम राणे, राकेश जयस्वाल ,योगेश हलमारे, विकास रामटेके, निप्पल बरैय्याा व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.