प्रहार वाहन चालक मालक संघटना महाराष्ट्र राज्य शाखा (नेरी ) चा अभिनव मदतीचा उपक्रम
योगेश्वर शेंडे
उपजिल्हा प्रतिनिधी,चंद्रपूर
चिमूर (१७ मे)- या कोरोना च्या मारामारीत गाड्यांचे मागील दिड वर्षापासून चक्के थांबले असुन अडचणीत अडचण माणुसकी धर्म जीवंत आहे हे दाखवुन वाहन चालकांनीच चालक भाऊला दिला मदतीचा आधार
सविस्तर वृत्त असे की मागील महिन्यात नेरी येथील रहिवासी वाहन चालक हरजीत सींग भौड हे कोव्हीड पाॅझीटीव्ह आले असुन त्यातल्या त्यात भगंदर आनी मुळव्याध चा आजार वाढल्यामुळे त्यांना आॅपरेशन ची अत्यंत गरज होती प्रविण वाघे यांनी घरी जाऊन प्रत्यक्ष चौकशी केली असता घरची परिस्थिती खुप हालाकिची होती कारन कोरोनाच्या प्रादुर्भावा मुळे मागील दिड वर्षापासून रोजी रोटी नाही घरी २ मुले पत्नी परिवार जगायचं कस हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता त्यातल्या त्यात अचानक वेळेवरच आजार झाल्याने खुप विचीत्र परीस्थिती होती त्यामुळे प्रवीण वाघे मनात मदतीची संकल्पना आली आणि संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक वाटसाफ ग्रुप च्या माध्यमातून एक मदतीची हाक म्हणून पोस्ट टाकली आमची मदतीची हाक एकुण नेरीसह तमाम महाराष्ट्रातील आमच्या जीवाभावाच्या वाहन चालक मालक भावांनी कुनी १००० तर कुनी ५०० तर कुनी ३०० तर कुनी २०० तर कुनी १०० तर कुनी ५० रु अशाप्रकारे कुनी संघटनेचा तर कुनी संस्था सर्व मतभेद बाजूला सारून सर्व अडचणी मध्ये असुन सुद्धा घासातला घास देऊन सरळ मनाने मदत केली मेल्यावर भावपुर्ण श्रद्धांजली वाहन्यापेक्षा जीवंत पनी एक मदतीचा हात म्हणून नेरी टीम सह रोख रक्कम ऋषी भाऊ कुवर आणि प्रवीण वाघे यांच्या नेतूत्वाखाली चालक हरजितसिंग भौड याना त्यांच्या घरी जाऊन देण्यात आली तसेच नेरी येथील याच संघटनेने मागील वर्षी कोरोना संकट काळात सर्व चालकाकडून वर्गणी काडून परिसरातील गरीब लोक मतिमंद लोक गरजू लोकांना जेवणाचा डब्बा त्यांच्या घरी पोहचवला होता ही एक उल्लेखनीय कामगिरी केली होती आता ही सर्व मदत केल्याबद्दल माझ्या सर्व माझ्या चालक मालक बंधूचे मनःपुर्वक आभार कोटी कोटी धन्यवाद मित्रांनो आम्ही आयुष्यभर तुमचे ऋुनी आहोत असे आभार प्रवीण वाघे आणि नेरी टीम ने मानले आहे.