यूथ फॉर सोशल जस्टिस या सामाजिक संघटनेचा पुढाकार
विलास केजरकर जिल्हा प्रतिनिधी भंडारा.
भंडारा दि. 31 मे:- जिल्ह्यातील यूथ फॉर सोशल जस्टिस या सामजिक संघटनेच्या वतीने दिनांक 1 जून ते 5 जून यादरम्यान पाच दिवसीय “ग्रामीण शिक्षण व उच्च शिक्षण” डिजिटल मालिकेचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
या पाच दिवसीय मालिकेत रोज रात्री 9 वाजता जगभरातील नामांकित वक्ते ysj bhandara या फेसबुक पेजवर live शिक्षण विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
यात प्रामुख्याने वर्धा येथील नालंदा अँकडमीचे संचालक अनुप कुमार, कॅनडा देशातून केतन टांगले, भंडारा येथील सय्यद अली मुबारक, फिनलंड देशातून धनीका सावरकर तर बेंगलोर येथील शुभम वनवे इत्यादीं ख्यातीप्राप्त नामांकित वक्ते शिक्षण विषयक मार्गदर्शन करणार आहेत.
तरी जिल्ह्यातील विद्यार्थी तथा पालकांनी या डिजिटल मालिकेच्या फेसबुकमधील ysj bhandara या पेजवर जाऊन “ग्रामीण शिक्षा ते उच्च शिक्षा” या डिजिटल मालिकेला मोठ्या संख्येत उपस्थित राहण्यांचे आवाहन यूथ फॉर सोशल जस्टिस या सामाजिक संघटनेचे योगेश शेंडे, प्रमोद केसलकर, सुधीर सार्वे, वैष्णवी खंगारे, राणी मराठे, वैष्णवी धांडे, सायली आदमने, फाल्गुनी भुरे, समीक्षा भोगे, स्वाती गणवीर, हितेश राखडे, चैतन्य कांबळे, पुष्पक पंचभाई, हर्षल भुरे, आदित्य जीभकाटे तसेच समस्त ysj टीमच्या सदस्यांनी केले आहे.