विजय शेवाळे
तालुका प्रतिनिधी.परंडा
परंडा:-जामखेड शहरातील बीड रोड लगत दूधडेरी जवळ रस्त्याच्या साईड पट्टी खराब झाल्याने मोटर सायकल अपघात झाला घटनेची माहिती विकास जाधव यांनी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना दिल्या बरोबर कोठारी यांनी ऍम्ब्युलन्स उपलब्ध करून दिली रात्री १० (दहा )वाजता अपघात झाला असून स्वतः घटनास्थळी येऊन त्यास जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले त्याच्या पोटाला गंभीर जखम झाली आहे सदर व्यक्ती ही स्प्लेंडर मोटर सायकल वर जामखेड वरून आपले गाव उंब्रट (पारगाव) तालुका जिल्हा बीड येथे जात अपघात झाला
त्याचे नाव तुळशीराम मधुकर काटे वय ३२ आहे त्याच्या नातेवाईकास माहिती दिली असून ते आले आहेत तसेच याकामी प्रफुल सोळंकी ,दत्ता साळुंखे ,विकास जाधव, निलेश जाधव , बंटी राळेभात,आकाश घागरे आदींनी मदत केली
यावेळी जखमीचे नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले असता त्यांनी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांचा जुना एक अनुभव सांगितला आमची गाडी पलटी झाली होती त्या वेळेस तुम्ही आम्हाला खूप मदत केली होती हा आमचा दुसरा अनुभव आहे त्यांनी कोठारी यांचे आभार मानले