अ भा अंनिस व नेफडोचा सहभाग
विलास केजरकर जिल्हा प्रतिनिधी भंडारा.
भंडारा, दि.7 जुन:- लाखनी येथील ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब तर्फे दरवर्षी मागील 15 वर्षापासून जागतिक पर्यावरण दिनी मान्सूनचा पाऊसाच्या आगमनाच्या पार्शवभूमीवर शंभर विविध प्रजातीच्या वृक्षरोपाचे वृक्षारोपण केले जाते.
यावर्षी सुद्धा वृक्षारोपणाचा कार्यक्रम लाखनी पोलीस स्टेशन, बसस्टॉपवर तसेच सावरी स्मशानभूमीत व तलावावर केले गेले. या कार्यक्रमाला लाखनी तालुका काँग्रेस कमिटी ने सुद्धा साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष तथा माजी विधानसभा सभापती नानाभाऊ पटोले यांच्या जन्मदिवसाचा योग साधून वृक्षारोपण कार्यक्रमात सहभाग नोंदविला. त्याचसोबत अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समिती जिल्हा भंडारा व नेफडो जिल्हा भंडारा यांचे सुद्धा सहकार्य या वृक्षारोपण कार्यक्रमाला लाभले.
यावेळी ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब चे कार्यवाह प्रा.अशोक गायधने, अध्यक्ष अशोक वैद्य,पदाधिकारी योगेश वंजारी,तालुका लाखनी काँग्रेसचे राजू निर्वाण, अँड. शफी लद्धानी, डॉ. चंद्रकांत निंबार्ते, प्रशांत वाघाये, भोला उइके, डॉक्टर अंबादे, वसंत मेश्राम, धनंजय तिरपुडे, कल्पना भिवगडे, लोकेश गायधने तसेच इतर अनेक काँग्रेस पदाधिकारी व सदस्य यांच्यासोबत ग्रीनफ्रेंड्सचे अभाअंनिस व नेफडोचे सदस्य नितीन पटले, रोहित पचारे, लोकेश भोंगाडे,आकाश मुळे, लोकेश चन्ने छविल रामटेके,ओम आगलावे, आरु आगलावे, नामदेव कानेकर,साकोली आगार प्रमुख गौतम शेंडे, बी एन डहाके तसेच सामाजिक वनीकरण साकोलीचे लागवड अधिकारी विलास बेलखोडे आणि रेंगेपार कोहळी येथील रोपवाटिका कर्मचारी व लोकेश गायधने यांचे वृक्षारोपण कार्यक्रमाला विशेष सहकार्य लाभले. यावेळी सामाजिक अंतर पाळण्याच्या दृष्टीने मास्कचे सुद्धा वाटप करण्यात आले. 6 जूनला सावरी येथील तलावावर व स्मशानभूमीत वृक्षारोपण वेळी सावरी उपसरपंच सचिन बागडे यांचा ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब तर्फे वृक्षभेट देऊन सत्कार सर्व पदाधिकारी व सदस्यामार्फत करण्यात आला.6 जूनच्या शिवराज्याभिषेक दिनाची माहिती यावेळी उपस्थित सदस्यांना ग्रीनफ्रेंड्सचे अशोक वैद्य व प्रा. अशोक गायधने यांनी देऊन ‘शिवाजीचे वृक्ष आणि पर्यावरण’ विषयक विचारांना उजाळा सावरी स्मशानभूमीतील वृक्षारोपण कार्यक्रमात देण्यात आला.