बबन हेमने तालुका प्रतिनिधी साकोली
साकोली(८जून) सद्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी संपूर्ण कोरोना मुक्ती ही संकल्पना लक्ष्यात घेऊन मौजा उमरी/लवारी येथे मनरेगा कामावर कामाच्या पूर्वसंध्येला मजुरांची कोरूना चाचणी घेण्यात आली .संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये किंवा बाधितांमुळे इतर मजुरांना संसर्ग होऊ नये याकरता ग्रामपंचायत व आरोग्य उपकेंद्र उमरी यांच्यावतीने आज ३०० मजुरांची कोरोना चाचणी घेण्यात आली.या कोरोना चाचणी करता उमरी गावचे सरपंच प्रल्हादजी सेन्द्रे व आरोग्य केंद्र विर्शी व उपकेंद्र उमरी यांचे खूप मोलाचे योगदान लाभले.आरोग्य विभागातर्फे डाँ. डोगरवार मॅडम सी. एच.ओ., डाँ. प्राजक्ता कापगते, डाँ. दीपक कापगते,डाँ. कांबळे ,डाँ. दुबे आरोग्य सेवक शेंडें व सिस्टर देवला यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच या उपक्रमात लीलाधर उपरिकर ,जितेंद्र मोटघरे,गीता कापगते,मंगला पात्रिकर ,छाया कापगते ,वामन पत्रिकर, ज्ञानेश्वर डोंगरे व इतर ग्रा.पं. सदस्य त्याचप्रमाणे आशावर्कर जोती मेश्राम, हेमलता लांजेवार,व इंजिनियर शाम कांबळे यांनी सहकार्य केले.