विलास केजरकर जिल्हा प्रतिनिधी भंडारा.
भंडारा, दि. १० जुन:-
जवळच्या गणेशपुर येथील नेहरू वार्ड मध्ये आदर्श युवा मंचचे कार्यकर्ता संजू मते यांच्या घरी जखमी अवस्थेत नीलकंठ राजा दुर्मिळ पक्षी आढळला लगेच माहित होताच आम्ही त्याला पशुवैद्यकीय दवाखान्यात नेऊन औषध उपचार केले
उपचाऱा दरम्यान डॉक्टरांनी सांगितले की, त्याचा पंख फैक्चर झाल्याचे सांगण्यात आले नंतर त्याला चारा-पाणी देऊन वन परिक्षेञ येथे राउंड ऑफिसर ईरशाद सैय्यद, वनरक्षक अनिल नडंगे, वनमजुर दुर्गाप्रसाद मेहर, वनरक्षक नीलेश श्रीरामे यांचा स्वाधीन करण्यात आले.
त्यावेळी आदर्श युवा मंचचे अध्यक्ष पवन मस्के, संजू मते, कार्तिक मते, विलास केजरकर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. या माध्यमातून जनतेला आवाहन करण्यात आले की, वन्य प्राणी व पाळीव प्राणी कुठेही संकटात पाहीले असता त्वरित मदत करावी असे आवाहन आदर्श युवा मंचचे अध्यक्ष पवन मस्के यांनी केले आहे.