विजय शेवाळे
तालुका प्रतिनिधी परंडा
परंडा दि.10 तालुक्यातील चिंचपूर (बु) येथे शिवराज मेडिकलच्या तिसऱ्या वर्धापनदिना निमित्त सामाजिक बांधिलकी जोपासत सावंतवस्ती येथील सर्व नागरिकांना घरोघरी जाऊन 51कुटुंबाला प्रथमोपचार साहित्य किट भेट देण्यात आले.यांमध्ये सर्दी,ताप, अंग-डोके-गुडघे दुखी,जुलाब, जखमेवरील मलमपट्टी यांचा समावेश आहे. व त्या गोळ्या-औषधाचा वापर कशा प्रकारे व कधी करायचा याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली.
यावेळी बोलताना बालाजी शिंदे म्हणाले की,कोरोना काळात देखील शिवराज मेडिकलच्या वतीने अल्पदरात गोळ्या-औषधे, सिनेटायजर, मास्क ची विक्री करण्यात आली होती.
तसेच गावातील बाजारतळात देखील वृक्षारोपण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
यावेळी बालाजी शिंदे,अमित माकुडे,जॉकी शिंदे, बालवीर शिंदे, सिद्धार्थ सावंत,नितीन सावंत, बालु शिंदे, कृष्णा शिंदे,दत्ता भराडे, ऋषीकेश मोकाशे, पत्रकार राहूल शिंदे आदी उपस्थितीत होते.