संजीव बडोले
जिल्हा प्रतिनिधी गोंदिया
नवेगावबांध दि. 12जुन:-
सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड व फुटाळा येथील covid-19 मुळे कोरोना आजाराने मृत्यू पावलेल्या यांच्या घरी गृहभेट आपुलकीची या अंतर्गत सौंदड साजा क्रमांक ६ चे तलाठी वाघधरे व मंडळ अधिकारी गजभिये यांनी भेट देऊन, तहसील कार्यालय सडक-अर्जुनी मार्फत आलेल्या अन्नधान्याची किट, मृत्यू पावलेल्या यांच्या घरी जाऊन कुटुंबातील सदस्य भावना जितेंद्र मोहबंशी राहणार सौंदड व सुनिता हेमराज ठाकरे राहणार फुटाळा यांना देण्यात आले. तसेच यांचे संजय गांधी निराधार योजना व राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचे अर्ज भरून त्यांच्या परिवाराला भेट देऊन त्यांना शासनाकडून जे लाभ मिळेल.ते मिळवून देण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.