सचिन संघई जिल्हा प्रतिनिधी वाशिम
वाशिम – करोना विषाणू संसर्गाच्या संकटावर नियंत्रण मिळविणे व नागरिकांना संसर्गापासून सुरक्षित ठेवण्यासाठी प्रभावी उपाय असलेल्या कोरोना प्रतिबंधक कोईशिल्ड लसीचा डोज हराळ येथे सरपंच आशाबाई विष्णु सरकटे यांच्या प्रयत्नाने नागरिकांना घरोघरी जाऊन लसीकरण करण्यात आले यामध्ये गावातील सर्व नागरीकानी सहभागी होऊन मोठा प्रतीसाद दिला सदर लसीकरण मोहीम यशस्वी होण्याकरिता सरपंच,उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधीकारी, शिक्षक तलाठी,आरोग्य, सेवक,ग्रामपंचायत कर्मचारी, संगणक परिचालक आशा वर्कर,अंगनवाडी सेवक, आदिसर्व कोरोना ग्राम समीती हराळ यांनी मोलाचे सहकार्य केले