विलास केजरकर जिल्हा प्रतिनिधी भंडारा.
भंडारा, दि. ३० जून:- युवा रूरल असोसिएशन नागपुरच्या वतीने कोरोना कोविड -19 या संसर्गजन्य आजाराने ज्या कुटुंब प्रमुखांचा जीव गमावला गेला अशा कुटुंबांना सहायता करण्याच्या अनुषंगाने अन्नधान्यांची किट वाटप करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक सचिव विलास केजरकर होते. त्यावेळी युवा रुरल असोसिएशनच्या जिल्हा समन्वयक मृणाल मुनीश्वर, समुपदेशक सुषमा बनसोड, महाराष्ट्र युवा परिषदेचे संवाद प्रमुख उमेश मोहतुरे उपस्थित होते.
यावेळी covid-19 या संसर्गजन्य आजाराने कुटुंब प्रमुखांचे निधन झाले अशा कुटुंबाला हातभार लावण्यासाठी जिल्ह्यातील 120 कुटुंबांना अन्नधान्याची किट देऊन आधार देण्यात आला. युवा रुरल असोसिएशन नागपुर या संस्थेच्या वतीने संस्थेचे संस्थापक दत्ता पाटील, मुख्याधिकारी ज्योती नगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली covid-19 या संसर्गजन्य आजारावर प्रतिबंध घालण्यासाठी जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यावेळी हातावर पोट भरणाऱ्या कुटुंबीयांचे आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला म्हणून त्या कुटुंबीयांना आधार देत आर्थिक मदत व अन्नधान्याची किट देण्यात आली तसेच ज्या कुटुंब प्रमुखाचा कोरोना या संसर्गजन्य आजाराने निधन झाले त्या कुटुंबीयांना फुल नाही फुलाची पाकळी म्हणून सामाजिक बांधिलकी जोपासून त्या निराधार महिलेला आधार देण्याचे काम युवा संस्था करीत आहे असे प्रतिपादन विदर्भ ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक सचिव विलास केजरकर यांनी व्यक्त केले.
ते महाराष्ट्र युवा रुरल असोसिएशन नागपूर द्वारा संचालित महिला युवा महिला व लहान मुलांकरिता सहायता कक्ष या कार्यालयात अन्नधान्याची किट वाटप करतांना बोलत होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता युवा रुरल असोसिएशन व महाराष्ट्र युवा परिषदेच्या पदाधिकारी व सदस्यांनी सहकार्य केले.