विजय शेवाळे
तालुका प्रतिनिधी परांडा
परंडा:-सालाबाद प्रमाणे जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन दिल्ली आणि वनविभाग जामखेड च्या संयुक्त विद्यमानाने वृक्षारोपण करण्यात आले आज मोहा भागातील घाटामध्ये वृक्षारोपण करण्यात आले यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी म्हणाले मी गेल्या पंचवीस वर्षांपासून वृक्षारोपण प्रत्येक शाळेमध्ये, डोंगर दरीमध्ये करत असतो कोणत्याही कार्यक्रमात वृक्ष देऊन सन्मान करत असतो दरवर्षी आम्ही वृक्षारोपण १ जुलै ते ३१ जुलै पर्यंत वृक्षारोपण करत असतो यावेळेस आम्ही एक नवीन उपक्रम हाती घेतला आहे चिंचोके डोंगर आम्ही डोंगरदऱ्यात टाकणार आहोत म्हणजे ते बरोबर येत असतात तसेच आंब्याच्या कोया या सुद्धा आम्ही गाडीतून जाताना टाकणार आहोत शिवाय उन्हाळ्यामध्ये या आलेल्या वृक्षांना संगोपनाची जबाबदारी पण आम्ही घेत असतो आम्ही या वृक्षाला टँकरने पाणी टाकतो पाणी टाकण्यासाठी अनुराग आनंद गुगळे यांची मदत होत असते यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, प्रफुल्ल सोळंकी, गौरव अरोरा ,अनिल फिरोदिया, वन अधिकारी किसन पवार, शहाजी डोंगरे , भोगल जय हरी आदी उपस्थित होते यावेळी बोलताना वनाधिकारी किसन पवार म्हणाले सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी हे दरवर्षी आमच्याबरोबर वृक्षारोपण करत असतात, तसेच मागील वर्षी दोनदा या सौताडा घाटातील डोंगराला आग लागली होती संजय कोठारी हे स्वतः रात्री दहा वाजता आम्हाला फोन करून सांगितले आणि स्वतः आग विजू लागले तसेच आत्तापर्यंत त्यांनी जखमी पक्षी व प्राण्यांना वाचण्याचे खूप मोठे काम केले आहे जखमी प्राणी हरीण, मोर, घुबड, सायाळ, काळवीट अशा अनेक पक्षी आणि प्राणी जखमी अवस्थेत आणून त्यांच्यावर उपचार करून आरण्यात सोडण्यास मदत केली सामाजिक क्षेत्रात त्यांचं काम उल्लेखनीय आहे आज आमच्या वन मजुरांना त्यांनी नाश्ता घेऊन आले त्याबद्दल त्यांचे आम्ही आभार मानतो असे कोठारी यांनी सांगितले.