विजय शेवाळे
तालुका प्रतिनिधी. परंडा
परंडा:-30 सप्टेंबर 2021 पर्यंत पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करणे आवश्यक आहे असे न केल्यास आपले पॅन कार्ड निष्क्रिय केले जाणार
तसेच निष्क्रिय पॅन कार्ड वापरल्यास प्राप्तिकर कलम 272B अंतर्गत 10 हजार रुपये दंड आकारला जाईल याविषयी आपण काल जाणून घेतले होते.दरम्यान आपले पॅन कार्ड आधारला लिंक आहे किंवा नाही ते कसे पाहता येईल याविषयी आज समजून घेऊ
पहा कसे पाहता येईल स्टेस्टस ?
यासाठी आपण सर्वप्रथम bit.ly/31rAk5C या वेबसाईटला भेट द्या , आपला पॅन आणि आधार क्रमांक टाकून view Link Aadhaar Status या बटणवर क्लिक करा
यानंतर आपले पॅन आधारला लिंक असल्याची किंवा नसल्याची माहिती मिळेल – याव्यतिरिक्त पॅन आधाराला लिंक करण्यासाठी आपण bit.ly/2ZEGX3a या वेबसाईटला भेट देऊ शकता.