विजय शेवाळे
तालुका प्रतिनिधी परंडा
परंडा:(दिनांक.3 जुलै 2021)जामखेड शहर आणि तालुक्यात लसीकरण व्यवस्थित रित्या चालू आहे आता पर्यंत 25 हजार लोकांनी लस घेतली असल्याची माहिती वैद्यकिय अधिक्षक डॉ संजय वाघ यांनी दिली 25जानेवारी पासून जामखेड व तालुक्यातील सर्व भागात लसीकरण चालू असणार आहे आत्तापर्यंत 25हजार लोकांना लसीकरण करण्यात आले आहे आम्ही व्यवस्थित रित्या सर्वांना लस देण्याचे काम चालू केले आहे सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी हे या कामात आम्हाला मदत करत आहेत अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ संजय वाघ यांनी दिली.आम्ही आलेली लस ही सकाळी सात वाजता टोकण वाटून लोकांना देण्याचे काम करत आहोत.18 ते सर्व गटातील लोकांना लस देण्यात येत आहे. सर्वांनी लसीकरण करून घ्यावे अशी आमची विनंती आहे यावेळी बोलताना संजय कोठारी म्हणाले अहमदनगर येथील जिल्हा लसीकरण केंद्र डॉ. लाळगे साहेब सतत आम्हाला जामखेड तालुक्याकरता व्यवस्थित रित्या लस देत आहेत 25 जानेवारी पासून आम्ही वैद्यकीय अधीक्षक डॉ संजय वाघ बरोबर लसीकरण करण्यासाठी मदत करत आहोत आमचे मित्र अमोल लोहकरे आणि प्रफुल्ल सोळंकी हे या कामात आम्हाला मदत करतात डॉक्टरांनी आत्तापर्यंत सर्वांना लस्सी करून करण्याचे आव्हान केले आहे आणि टोकन सिस्टीम मुळे व्यवस्थितरीत्या लसीकरण प्राप्त होत आहे