विजय शेवाळे
तालुका प्रतिनिधी.परंडा
परंडा [ दि१२ जुलै ] परंडा येथील कोर्टासमोर डिव्हाईडर वर वृक्ष मित्र सुधीर वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्ष संवर्धन समिती,परंडा यांनी १०१झाडे लावून वृक्ष संवर्धनाची जोरदार सुरुवात केली.यासाठी सर्व वृक्ष मित्रांनी पुणे येथून ८ फूट उंचीची रोपे आणून झाडांची लागवड केली,यासाठी बार्शी येथून वृक्ष संवर्धन समितीचे बार्शीचे राणा देशमुख उमेश नलवडे,राहुल काळे,गायकवाड सर,फल्ले साहेब तावरे सर व जाणीव फाऊंडेशन,बार्शीचे उपाध्यक्ष वसंत मामा हवालदार, किरण आकोसकर,संतोष मस्के हे सदस्य त्यांच्या वृक्षरथासह उपस्थित होते.
परंडा येथील वृक्ष संवर्धन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब घोगरे,चेअरमन जयदेव गंभीरे,धन्यकुमार सुतार,अप्पा बल्लाळ,परमेश्वर जगताप,शिवाजी पंडीत,धनाजी खरात,आदिकराव शेळवने, कानडे दाजी,तानाजी तरंगे,गणेश भाग्यवंत, महेश शिंदे,अमोल अंधारे,शिवाजी वाघमारे,रविंद्र थोरात विश्वास गायकवाड ओंकार रगडे,धीरज गंभीरे,धनराज बनसुडे,यांच्यासह अनेक वृक्ष मित्र उपस्थित होते.यावेळी महादेव विटकर सर यांचा वाढदिवस झाड लावून साजरा करण्यात आला. पत्रकारनी वृक्ष लावडीत सहभाग नोंदवत वृक्ष लागवड केली.
तसेच परंडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनिल गिड्डे यांनी ही या वृक्ष लागवड मोहीमेत सहभागी होत वृक्ष लागवड केली.