उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल ठाकूर यांचे प्रतिपादन.
उप पोलीस स्टेशन पेरमिली येथुन कृषी समृद्धी मेळावा अंतर्गत मत्स्य शेती उत्पादन प्रकल्पाची सुरुवात.
निलीमा बंडमवार
ग्रमिण प्रतिनिधी पेरमिली
पेरमिली/गडचिरोली- गडचिरोली जिल्हा पोलीस दल उपविभाग अहेरी अंतर्गत उप पोलीस स्टेशन पेरमिली चे वतीने दुर्गम भागातील आदिवासी शेतकऱ्यांना कृषी विषयक विविध योजनांची माहिती व लाभ देण्याच्या उद्देशाने कृषी समृद्धी योजना अंतर्गत पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया, अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक सोमय मुंढे, अहेरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल ठाकूर यांचे मार्गदर्शनाखाली कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
सदर मेळाव्यात मैत्री संस्थेच्या संयुक्त विद्यमाने व पीएसआय धनंजय पाटील यांच्या संकल्पनेतून मत्स्य शेती उत्पादन प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटक अध्यक्ष अमोल ठाकूर उपविभागीय पोलिस अधिकारी अहेरी त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मत्स्य शेती विषयी अधिक माहिती देऊन पारंपारिक नैसर्गिक रित्या मत्स्य पालन न करता आर्थिक प्रगती करण्याच्या दृष्टिकोनातून मत्स्यपालन करण्याचे व प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेत अनुदान घेऊन गोड्या पाण्यातील मत्स्य शेती करण्याचे आवाहन केले. पोस्टे पेरमिली नजीक तयार करण्यात आलेल्या डेमो तलावांमध्ये मस्त्य शेती विषयी प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. पोस्टेचे अंमलदार मधुकर आत्राम व विवेक सिडाम यांनी लोकांना समजेल असे गोंडी भाषेतून चांगल्या प्रकारे मस्य शेती कशी करता येईल याचे प्रत्यक्ष सादरीकरण करून दाखवले. कार्यक्रम प्रसंगी शेतकऱ्यांना अलका तलांडी मॅनेजर मैत्री संस्था यांनी मत्स्यपालन या विषयावरती तर व्हि. एस. डोंगरे कृषी सहाय्यक अहेरी यांनी शासनाच्या कृषी विषयक विविध योजना, धान शेती, शेवगा शेती व मनरेगा अंतर्गत फळबाग लागवड याबाबत माहिती दिली. सदर कार्यक्रमा मध्ये आत्मा संस्थेकडून प्राप्त झालेले नवीन ठोकळ सिंदेवाही धानाचे बीज 14 शेतकऱ्यांना वाटप केले. मैत्री संस्थेकडून तलाव असणाऱ्या 300 शेतकऱ्यांना मत्स्यबीजाची वाटप करण्यात येणार असून सर्व शेतकऱ्यांची कागदपत्रे जमा करण्यात आली. या मेळाव्यात परिसरातील 400 ते 500 नागरिकांची उपस्थिती होती. पीएसआय धनंजय पाटील यांनी तयार केलेली मत्स्य शेती विषयक मार्गदर्शन पत्रिका सर्व उपस्थित शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले. कार्यक्रमास अध्यक्ष अमोल ठाकूर उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी, सीआरपीएफचे असिस्टंट कमांडंट हरीश शर्मा, प्रभारी अधिकारी पंकज सपकाळे, पीएसआय धवल देशमुख, पीएसआय गंगाधर जाधव, पेरमिली चे सरपंच किरण नैताम, ग्रामसेवक मेश्राम, तलाठी गुबडे, माजी सरपंच प्रमोद आत्राम, उपसरपंच सुनील सोयाम, प्रदीप मानकर, येरमनार चे सरपंच विजय आत्राम, पेरमिली आरोग्य केंद्राचे नेत्रतज्ञ,पत्रकार डॉक्टर शंकर दुर्गे, पत्रकार असीफखान पठाण, पत्रकार श्रीनिवास बंडमवार, तसेच एस आर पी एफ व सी आर पी एफ चे सर्व अधिकारी जवान व पोस्ट पेरमिली चे सर्व अमंलदार उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी अधिकारी पंकज सपकाळे यांनी केले व नागरी कृती शाखेच्या माध्यमातून पोस्टे स्तरावर आजपर्यंत राबविण्यात आलेल्या विविध योजनाची माहिती दिली. उपस्थिताना भोजनाची व्यवस्था करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी अधिकारी पंकज सपकाळे यांनी केले.