राहुल रामटेके
तालुका प्रतिनिधी,नागभिड
नागभिड (13 जूलै) नागभिड तालूक्यातील तळोधी येथे लोकमत वृत्तप्रत्र समुह व जिल्हा सामान्य रुग्नालय चंद्रपूर यांचे विद्यमाने स्व.जवाहरलाल दर्डा यांचे जयंतीचे औचित्य साधुन भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेल्या शिबिरात ३६ रक्तदात्यानी रक्तदान केले. याशिबिराचे उद्घाटन तळोधीच्या सरपंच सौ. छायाताई मदनकर यांनी केले.तर अध्यक्षस्थानी जि.प.सदस्य खोजराम मरसकोल्हे, हे होते.तर प्रमुख पाहुणे राष्टँवादिचे तालुका अध्यक्ष डाँ रघुनाथ बोरकर, डाँ. गैरव देशमुख पोलिस उपनिरिक्षक आकाश साखरे, सरपंच सघटनेचे अध्यक्ष हेमंत लाजेवार,माजी भाजपा अध्यक्ष होमदेव मेश्राम, तालुका भाजपा महामंत्री जगंदिश सडमाके,तालुका प्रतिनिधी घनशाम नवघडे, अरून गायकवाड, डाँ.स्वप्निल कामडी आरोग्य सेविका अंजूशा गिरडे,पि.बि.दुनेदार,संयोजिका संगिता अगडे, देवकन्या मदनकर, पवन अगडे, न्युज रिपोर्टर राहुल रामटेके, अनिकेत अगडे,भारत चुनारकर, मोनिल देशमुख, आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तळोधीचे प्रतिनिधी संजय अगडे यांनी केले तर उपस्थिताचे आभार राजेश बारसागडे यांनी मानले.