राजअनिल पोचमपल्लीवार
विदर्भ संपादक गडचिरोली
चामोर्शी -दिनांक 14 जुलै 2021 येथील बँक ऑफ महाराष्ट्र येथे आज गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ देवराव होळी यांच्या हस्ते महाराष्ट्र बँक व्यवस्थापक चौधरी भाजप तालुका अध्यक्ष दिलीप चलाख, भाजप ओबीसी आघाडी नेते भास्कर पाटील बुरे, भाजप तालुका महामंत्री साईनाथ भाऊ बुरांडे, किसान क्रेडिट कार्ड धारक शेतकरी अशोक बनपुरकर युवा नेते प्रतीक राठी यांच्या उपस्थितीत तालुक्यातील धान व मक्का उत्पादक शेतकरी यांना वेळोवेळी पैश्याची उपलब्धता होण्यासाठी गडचिरोली विधानसभा मतदार संघातील चामोर्षी येथून किसान क्रेडिट कार्ड आज दुपारी बारा वाजता वाटप करणे सुरुवात करण्यात आले.
नवीन किसान क्रेडिट कार्ड तयार करणे बाबत माहिती मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित शेतकरी बांधवांना आमदार डॉ देवराव होळी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी तालुक्यातील शेकडो शेतकरी बांधवांनी या किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ घेतला सदर किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन भारतीय जनता पार्टी तालुका चामोर्षी चे वतीने करण्यात आले होते.