इंदूरखा येथील शेत शिवारातील घटना
विलास केजरकर जिल्हा प्रतिनिधी भंडारा.
भंडारा, दि. १६ जुलै :- तालुक्यात येत असलेल्या इंदुरखा येथील शेत शिवारातील विहिरीत तीन रानडुक्कर पडलेले होते. त्यापैकी भंडारा वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक राजूरकर व कर्मचा-यांना दोन जिवंत तर एक मृत अवस्थेत बाहेर काढण्यात यश आले आहे.
सविस्तर वृत्त असे की, गुरुवार दिनांक १५ जुलै ला भंडारा वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय व तालुक्यातील इंदूरखा येथे शेतात असलेल्या 70 फुट खोल विहिरीमध्ये तीन रानडुक्कर पडलेले आढळले होते. म्हणुन घटनेची मिळताच
भंडारा वन परिक्षेत्र अधिकारी व RRU चमु घटनास्थळी जाऊन 70 फुट खोल असलेल्या विहिरीमध्ये पडलेल्या 3 रानडुक्करांना RRU भंडारा मार्फत शारीरीक प्रक्रिया करुन विहिरीमध्ये पडलेल्या 3 रानडुक्करांना बाहेर काढण्यात आले. त्यापैकी 2 रानडुक्करांना लगतच्या जंगलात सोडण्यात आले व एक रानडुक्कर मृत झाल्याने त्याला पशुधन अधिकाऱ्यांच्या तपासणीनंतर शासकीय वनक्षेत्रात दफन करण्यात आले.
सदर कार्यवाही भंडारा वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक राजुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
यावेळी निलेश श्रीरामे, वनरक्षक,आर.एच. इरपाची, वनपाल, गस्तीपथक पातोडे, वनमजुर निहाल गणवीर, सर्पमित्र अनुराग गायधने यांनी मोलाचे सहकार्य केले.
तसेच या परिसरात रानडुकरांचा हैदोस मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेत पिकाची मोठ्या प्रमाणात नुकसान करीत असतात. यांचा बंदोबस्त त्वरित करण्याची मागणी गावक-यांनी केली आहे.