भारतीय स्टेट बँकेचा नाविन्यपूर्ण उपक्रम
विलास केजरकर जिल्हा प्रतिनिधी भंडारा.
भंडारा, दि, 15 जुलै:- देश, राज्य व जिल्ह्यात कोरोना कोविड-१९ या संसर्गजन्य आजारांने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. त्यात पहिल्या लाटे पेक्षा दुसरी लाट अत्यंत भयानक होती की, त्यात ऑक्सिजन अभावी अनेक नागरिकांना स्वतःचे प्राण गमवावे लागले. त्यावर विचार करून सामाजिक बांधिलकी जोपासत भारतीय स्टेट बँक भंडारा शाखेच्या वतीने कोरोनाची तिसरी लाट येण्यापूर्वीच जिल्हा सामान्य रुग्णालयाला 2 होरेस सिलेंडरचे वितरण व भारतीय स्टेट बँक येथे कार लोन हपचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन मुंबई येथील महाप्रबंधक संजय श्रीवास्तव यांच्या हस्ते, नागपूरचे उपमहाप्रबंधक व्हि चंद्रशेखर, गोंदिया येथील क्षेञिय व्यवसाय कार्यालयाचे सहाय्यक महाप्रबंधक सत्यरूपम मेश्राम, भंडारा येथील मुख्य प्रबंधक सिद्धार्थ कडबे, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर एस फारुकी यांच्या उपस्थित जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना कक्षाला दोन डुरा आँक्सीजन सिलेंडरचे वितरण करण्यात आले. त्यानंतर भारतीय स्टेट बँक येथे कार लोन हपचे उद्घाटन करण्यात आले. तसेच बँकेच्या सर्व विभागात जाऊन कर्मचाऱ्यांच्या कामाचा लेखाजोखा घेऊन त्यांना येत असलेल्या अडचणी दूर करण्यात आल्या. आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कार लोनच्या ग्राहकांना प्रमाणपत्र देऊन व भारतीय स्टेट बँक मध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या गीता उपलप अन्य कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता भारतीय स्टेट बँकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.