विलास केजरकर जिल्हा प्रतिनिधी भंडारा.
भंडारा, दि.15 जुलै :- पारस मिरॅकल उद्योग, इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन, श्री सिद्धेश्वर योग निसर्गोपचार केंद्र, पतंजलि परिवार भंडारा तसेच भंडारा जिल्हा मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 15 जुलै 21 ला सकाळी 8 वाजता पत्रकार भवन भंडारा येथे जलनेती पाञांचे वितरण प्रात्याक्षिक करुन जलनेतीचे प्रशिक्षण देण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पञकार प्रा. वामन तुरिले होते. प्रमुख पाहुणे म्हणुन अँड. जयंत वैरागडे, भंडारा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन भैरम, कॉ. हिवराज उके, इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशनचे जिल्हा संयोजक तथा भारत स्वाभिमान न्यासचे जिल्हा प्रभारी डॉ. रमेश खोब्रागडे उपस्थित होते. इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशनचे जिल्हा संयोजक तथा भारत स्वाभिमान न्यासचे जिल्हा प्रभारी डॉ. रमेश खोब्रागडे यांनी जलनेतीचे प्रशिक्षक दिले व जलनेती अभियान अंतर्गत प्रत्येकांना जलनेती पात्रांचे वाटप करून जलनेतीचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच सर्वांकडून प्रात्यक्षिक करून घेतले.
त्यात जवळपास पन्नास पञकार व नागरिकांनी सहभाग घेतला होता.
जलनेती करणे म्हणजे कोरोना या संसर्गजन्य आजारावर प्रतिबंध लावण्यासाठी महत्वाचे आहे असे प्रतिपादन जेष्ठ पञकार प्रा. वामन तुरिले यांनी केले.
भंडारा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन भैरम म्हणाले की, जलनेती ही क्रिया करण्यास मनात भिती वाटत होती. माञ तुरिले सर यांनी सहज रित्या केल्यावर भिती नाहीशी झाली आहे. तर ही क्रिया केल्यावर मन प्रशन्न झाले आहे असे मत व्यक्त केले.
तसेच मान्यवरांनी विविध मार्मिक उदाहरण देऊन मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशनचे जिल्हा सचिव तथा पतंजली किसान सेवा समितीचे तालुका प्रभारी विलास केजरकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार मिलींद हळवे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता राजु आगलावे, सागर ठाकरे, संजय भोयर, प्रमोद गभणे, विनोद बुजाडे, संजय धूत, संजय बाळबुध्दे, बालकदास भुरे, प्रविण कारेमोरे व भंडारा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी, पञकार तसेच नागरिकांनी सहकार्य केले आहे.