अस्लम शेख
तालुका प्रतिनिधी माळशिरस.
ता माळशिरस.मळोली येथे कै. जयसिंगराव जाधव कोव्हिड केअर सेंटर गेल्या 3 महिन्या पासुन चालू आहे परिसरातील अनेक रुग्णानां दिलास मिळाला आहे अनेक रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत त्यामुळे अनेकांना जीवदान देणारे हे कोव्हिड केअर सेंटर ठरले आहे त्यासाठी डॉक्टरांनी अहोरात्र कष्ट घेतले आहे दररोज तपासणी साठी येणारे डॉक्टर.विजय सुरवसे.दिनेश शिंदे.विजय निलटे.व मळोली आरोग्य उपकेंद्राचे समुपदेशन अधिकारी डॉ.जावेद मकानदार.व परिचारिका कु.आरती वाघमारे हे रुग्णांची सेवा करण्यासाठी नेमण्यात आले आहे.आज 9 रुग्णांना डीचार्ज देण्यात आला.त्यावेळी राजाभाऊ जाधव.मिलिंद जाधव.पत्रकार अस्लम शेख.उपस्थित होते. दररोज रुग्णांची चौकशी करण्यासाठी गट नेते रणजितसिंह जाधव हे आपला बहुमोलाचा वेळ देतात.