विजय शेवाळे
तालुका प्रतिनिधी.परंडा
परंडा तालुक्यातील लोणारवाडी येथे वॉटर संस्थेमार्फत पाणलोट व्यवस्थापक अंतर्गत इंडोसं बँक यांच्या अर्थसहाय्याने शेतकऱ्यांचे उत्पादन कमी खर्च आणि माती आडवा पाणी वाचवा आरोग्य जपण्यासाठी संस्थेचे भूम परंडा इन्चार्ज कांतीलाल गीते व समाज विकास अधिकारी समिना पठाण मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली अक्षय नागरगोजे यांनी लोणार येथे कृषी प्रत्यक्ष माहिती दिली
यावेळी दशपर्णी अर्क जीवामृत पाणी कसे बनवायचे व कोणकोणत्या वनस्पतीचे वापरायच्या याबद्दल शेतकऱ्यांना सविस्तर माहिती दिली व गांडूळ बेड हात्रुन गांडूळ बेड कोणत्या पद्धतीने भरायचा व त्याची कशी निगा राखायची याबद्दल लोणारवाडी येथील शेतकऱ्यांना सविस्तर माहिती दिली
यावेळी येथील जलसेवक बाळासाहेब जमदारे महिला समाज सेविका रतन किर्दक व शेतकरी मोहन घरत.आकाश घरत. इंदुबाई किर्दक यांच्यासह महिला व सर्व ग्रामस्थ यांनी उपस्थित होते यानंतर सर्व शेतकऱ्यांनी अक्षय सर व शेळगाव इन्चार्ज अर्चना मुळे यांचे अभिनंदन केले