विजय शेवाळे
तालुका प्रतिनिधी परंडा
परंडा:-करमाळा शहरातील सुमंतनगर भागात राहणारे पेंटर
राजेंद्र उर्फ सोमनाथ कांबळे हे काल दिनांक 17 जुलै रोजी रात्री
9 वाजता घरात टीव्ही पाहत असताना आरोपी रोहित राहुल मुळूक ,रा,चांदगुडे गल्ली ,याने अचानक घरात घुसून जीवे मारण्याचे दृष्टीने राजेंद्र कांबळे यांचेवर धारदार शास्रने सपा सप वार करायला सुरु केले राजेंद्र यांनी त्याला विचारले तू मला का मारतोस तेव्हा सदर आरोपीने काहीही न बोलता वार करणं सूरु ठेवले तेवढ्यात कांबळे यांचे आईने ते पहिले व आरडा ओरडा केला त्यामुळे शेजारील राहणारे देवा लोंढे ,नामदेव लोंढे तेथे दाखल झाले तोपर्यंत आरोपी तेथून पळून गेला धारदार शस्रने वार झाल्यामुळे राजेंद्र कांबळे याना शरीरावर चेहऱयावर डोक्यावर गंभीर दुखापत झाली होती त्यांना ताबडतोप उपचारासाठी अंबुलेन्स मध्ये उपजिल्हा रुग्णालय करमाळा येथे हलवण्यात आले , लवकर उपचार मिळाल्याने कांबळे थोडक्यात बचावले आहेत ,सध्या त्यांची प्रकुर्ती स्थिर असल्याचं उपचार करनारे डॉक्टरांनी सांगितले ,असून करमाळा पोलीस स्टेशन येथे आरोपी विरोधात गुन्हा दाखल झाला असून आरोपी चा तपास पोलीस निरीक्षक कोकणे साहेब उपनिरीक्षक जगताप साहेब करत आहेत ,सदर आरोपीला लवकरात लवकर अटक करून कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करमाळा शहरातील दलित संघटनांनी केली आहे